टायग्रिस
टायग्रिस : नैर्ऋत्य आशियातील युफ्रेटीसच्या जोडीची, तिच्या पूर्वेकडील सुप्रसिद्ध नदी. लांबी सु. १,९०० किमी. ही आग्नेय तुर्कस्तानात कुर्दिस्तानच्या पर्वतातील एका सरोवरातून निघून डिकल नावाने आग्नेयीकडे दियार्बाकरवरून जाऊन चिझ्रेहून सु. ५० किमी. सिरियाच्या सीमेवरून जाते.